Vacation and Holiday Benefits

Vacation and Holiday Benefits सुट्टी किंवा प्रवास उगीच असत नाही जीवनातील हे उपक्रम कुटुंबं, समाज आणि स्वतःसाठी वेळ देणारे आहेत. याहून परतल्यावर पुन्हा तुम्ही आपल्या कामासाठी जुंपून घेऊ शकता. अशा प्रकारच्या सर्व रजांची सोय अतिशय विचार पूर्वक करून ठेवण्यात आली आहे. व्यस्त व्यक्तीच्या कुटुंबातील लोक सुट्टीची वाट पाहत असतात. आपले आई वडील त्या दिवशी आतापर्यतची सर्व भरपाई करून देणार आहेत, याची त्यांना जाणीव असते. तुम्ही मुलांसोबत मुल होता. त्यांच्यासोबत अंताक्षरी खेळता, पत्ते खेळता तेंव्हा कोणत्याही वयात तुमच्यातील मूल जागे होत असते. पद आणि दिखावूपणाचे सर्व मुखवटे गळून पडतात.

holiday benefits

असा वेळ मिळणे खरं तर खूप अवघड असते. पण तो खूप आनंददायी असतो. प्रवासात आपण खूप गप्पा गोष्टी करीत असतो. एक दुसऱ्या बाबत खूप काही माहित करून घेत असतो. दुसऱ्यांना समजून घेत असतो. आपल्याला समजून घेण्याची संधी मिळत असते. या सर्व गोष्टी मानसिक आणि व्यावहारिक पातळीवर खूप महत्वाच्या असतात. त्यांच्यामुळेच जीवनाला अर्थ मिळून ते खऱ्या अर्थाने जीवन होत असते. जीवन वेळेची सार्थकता कळते. पुन्हा ताजे तवाने होण्याचा अमूल्य मंत्र हाच आहे.Vacation and Holiday Benefits

रिकामा वेळ आणि रिकामपण काही संबंध आहे?
रिकाम्या वेळेमुळे आपल्याला जीवनातील रिकामपणा खायला तर उठणार नाही ना. या भीतीमुळे अनेक लोक रिकाम्या वेळेशी 36 चा आकडा ठेवीत असतात. त्यामुळे स्वतःसाठी अजिबात रिकाम वेळ न काढणे आपल्यावर अन्याय करण्यासारखे असते. कधी जाणवायला लागले तर रिकामपणाचा अर्थ समजून घ्यायला हवा. आपण आपल्यासाठी वेळ काढणे, सर्व प्रकारच्या व्यस्तता बाजूला ठेवून आपल्या आवडीच्या कामासाठी वेळ काढणे असते.

या प्रकरणात रिकामा वेळ म्हणजे थोड्या फार प्रमाणात मिळणारा रिकामा वेळ जो दोन कामाच्या मध्ये मिळत असतो, तो होय काही वेळी जीवनात अशी भयंकर परिस्तिथी निर्माण होत असते कि भयानक रिकामेपनाची जाणीव होत असते. एखाद्या प्रिया व्यक्तीचा विरह होणे किंवा मुलांचे नोकरी किंवा शिक्षणासाठी परदेशी जाणे यामुळे अशा रिकामपणाची, शून्यतेची जाणीव होत असते. या रिकामपणाचे व्यवस्थापन आवश्यक असते.

गंगाराम  हॉस्पिटल दिल्ली येथील कन्सल्टंट सायकॉलॉजिस्ट आरती आनंदही अशा वेळेला जीवनात शून्यतेचा आभास करणारी परिस्थिती समजतात. जुन्या मित्राशी संपर्क करणे मित्र बनविण्यासाठी प्रयत्न करण्याचा त्या सल्ला देतात.

holiday

1 thought on “Vacation and Holiday Benefits”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.